ग्रामीण क्षेत्रातील युवक कल्याण विस्तार-निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करणे.
विविध स्तरावरील 15 ते 35 वयोगटातील युवकांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. युवकांशी निगडीत असलेले विषय, राष्ट्रीय एकात्मता सामाजिक विकास व राष्ट्रीय विकासाशी संबंधित मुद्ये विचारात घेवून स्पर्धेसाठी विषय निवडण्यात येतो. स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकांना रु.500/-, रु.300/-, रु.100/- बक्षिस देण्यात येते.
संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी
2
सामुदायिक सहभागासाठी विविध कार्यक्रम कार्यान्वित करणे.
राज्यातील विविध वयोगटातील युवकांची शारीरिक क्षमता वाढविणे आणि खेळाची आवड निर्माण करणे यासाठी तालुका व जिल्हास्तरावर लांब पल्ल्यांच्या धावण्याच्या शर्यती व सायकल शर्यतीचे आयोजन करुन मोठया प्रमाणात युवकांना सहाभागी करुन घेण्यात येते. त्याकरिता तालुकास्तर मॅरेथॉनकरिता रु.1500/- जिल्हास्तर मॅरेथॉनकरिता रु.4,000/- तालुकास्तर सायकल शर्यत करिता रु.500/- जिल्हास्तर सायकल शर्यत करिता रु.1,400/- इतके अनुदान देण्यात येते.
संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी
3
राज्यातील जिल्ह्यामध्ये क्रीडा दिन क्रीडा सप्ताह साजरा करणे.
राज्यात क्रीडा संस्कृतिची जोपासना व जनतेत क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्हयात दरवर्षी क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्यात येतो.यामध्ये क्रीडाविषयक विविध उपक्रम,स्पर्धा,खेळाडूंचा सत्कार,चर्चासत्रे,प्रदर्शने इ.समावेश आहे.त्याकरिता प्रत्येक जिल्हयास अनुदान देण्यात येते.शासन नियमांच्या अधिन राहून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत दि.29 ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच दि.12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. युवकांकरिता युवांशी निगडीत विविध उपक्रम राबविता येतात.
संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी
4
युवक केंद्र व इतर संस्थांना आर्थिक सहाय्य (युवा दिन युवा सप्ताह साजरा करणे)
युवकांचा सर्वागिण विकास करणे आणि राष्ट्रीय व सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी युवकांना उद्युक्त करण्याकरिता स्वामी विवेकानंद यांचा दि.12 जानेवारी हा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून प्रत्येक जिल्हयात साजरा केला जातो. तसेच 12 ते 19 जानेवारी या कालावधीत युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये युवकांकरिता विविध उपक्रम राबविण्यात येतात.
संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
योजनेशी संबंधित तपशील
अनुक्रमांक
वर्णन
नस्तीचा प्रकार
फाईल / URL
तारीख
1
ग्रामीण क्षेत्रातील युवक कल्याण विस्तार-निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करणे.
PDF
24 सप्टें 1990
योजनेशी संबंधित तपशील
अनुक्रमांक
वर्णन
नस्तीचा प्रकार
फाईल / URL
तारीख
2
सामुदायिक सहभागासाठी विविध कार्यक्रम कार्यान्वित करणे.
PDF
28 डिसें 1989
योजनेशी संबंधित तपशील
अनुक्रमांक
वर्णन
नस्तीचा प्रकार
फाईल / URL
तारीख
3
राज्यातील जिल्ह्यामध्ये क्रीडा दिन क्रीडा सप्ताह साजरा करणे.
PDF
31 जुलै 1997
योजनेशी संबंधित तपशील
अनुक्रमांक
वर्णन
नस्तीचा प्रकार
फाईल / URL
तारीख
4
युवक केंद्र व इतर संस्थांना आर्थिक सहाय्य (युवा दिन युवा सप्ताह साजरा करणे).