| 1 |
तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार |
जमीन, समुद्र आणि हवेमधील साहसी क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरीबद्दल तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. प्रत्येक पुरस्कारार्थीस रु.05.00 लक्ष रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. सदर पुरस्कार हा अर्जुन पुरस्काराच्या बरोबरीचा असून भारताच्या सन्माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते दरवर्षी ऑगस्ट महिन्यात राष्ट्रपती भवनातील एका कार्यक्रमात अर्जुन पुरस्कारांसह प्रदान केले जातात. सदर पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील साहसी खेळाडूंच्या नावांची शिफारस राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या शिफारशीसह केंद्र शासनाकडे करण्यात येते. सदर योजनेची माहिती www.yas.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. |
| 2 |
राष्ट्रीय युवा पुरस्कार |
राष्ट्रीय स्तरावर युवक कल्याण विषयक सामाजिक कार्यात कार्य करणाऱ्या 15 ते 29 या वयोगटातील युवकांना व संस्थांना केंद्र शासनामार्फत पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. प्रतिवर्षी २५ युवांना व १० संस्थांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पुरस्काराची रक्कम प्रति व्यक्ती रु.50,000/- असून प्रत्येक संस्थेस रु.02.00 लक्ष आहे. पुरस्कारासाठी संस्था सोसायटी रजिट्रेशन ॲक्ट 1860 नुसार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. सदर पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील युवांना व संस्थांच्या नावांची शिफारस राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या शिफारशीसह केंद्र शासनाकडे करण्यात येते. सदर योजनेची माहिती www.yas.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. |