माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयता 10 वी) उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या, खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत नियमावली.
राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन,प्रसार, प्रचार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असण्याच्या दृष्टीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयता 10 वी) उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या, खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. खेळाडू विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडा कामगिरीनुसार 25 पर्यंत, एन.सी.सी., मधील विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीनुसार 20 पर्यंत व स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीनुसार 10 पर्यंत सवलतीचे वाढीव गुण देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 अंतर्गत आपले सरकार (https://aaplesarkar.maharashtra.gov.in) या वेबपोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर, सदर योजनेचा अर्ज ऑनलाईन उपलब्ध होईल.
संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी
2
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण-2012- शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या शाळांना अनुदान.
शालेय क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील मुला / मुलींना सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करता यावे यासाठी सदर योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. अनुदानाची रक्कम:- 1. जिल्ह्यातील १४, १७, व १९ या वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील खेळ निहाय कामगिरीनुसार प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रु. 1.00 लक्ष, 0.75 लक्ष व 0.50 लक्ष इतके प्रोत्साहनात्मक अनुदान अनुज्ञेय आहे. 2. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या राज्यातील सर्वोत्कृष्ट तीन शाळांना प्रत्येकी रु. 2.00 लक्ष इतके प्रोत्साहनात्मक अनुदान अनुज्ञेय आहे. 3. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांच्या शाळांना प्रत्येकी 7.00 लाख व 4 ते 10 क्रमांकापर्यंत पदकविजेते खेळाडू तयार करणाऱ्या शाळांना प्रत्यकी रु.3.00 लाख इतके प्रोत्साहनात्मक अनुदान अनुज्ञेय आहे.
संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी
3
इयता 11 वी चे प्रवेश देताना कला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणा-या विदयार्थ्यांना अनुक्रमे 2 टक्के व 3 टक्के जागा राखून ठेवण्याबाबत.
राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रसार, प्रचार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असण्याच्या दृष्टीने, इयता 11 वी चे प्रवेश देताना कला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणा-या विदयार्थ्यांना अनुक्रमे 2 टक्के व 3 टक्के जागा राखून ठेवण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजने अंतर्गत पात्र खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच विभागीय उपसंचालक यांचेकडून पात्रता प्रमाणपत्र देण्यात येते. सदर कोटा केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होणारे खेळाडू विद्यार्थी व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील पदक विजेते खेळाडू विद्यार्थी यांच्याकरिताच उपलब्ध राहील.
संबंधित विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी
4
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,२०१२-शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन.
महाराष्ट्र राज्याला क्रीडा संस्कृतीचा मोठा वारसा आहे. त्यानुसार राज्यातील भागातील विद्यार्थ्यांना खेळांच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी निर्माण व्हावी, याकरीता भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय या योजनेअंतर्गत घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत तालुका ते राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करुन त्यामधून उत्कृष्ट खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी केली जाते.
संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी
5
राज्याचे क्रीडा धोरण,2012- क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
जिल्हयात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन,प्रचार,प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. खेळामधील बदलेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती, नवीन खेळ, खेळांची शास्त्रेाक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना होणे आवश्यक आहे. तालूका,जिल्हा क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रात होणारे बदल अवगत होण्यासाठी जिल्हयातील शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी या योजने अंतर्गत प्रति जिल्हा 100 क्रीडा शिक्षकांना अद्यावत प्रशिक्षण दिले जाते.
संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी
6
जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यास मान्यता
जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना या योजने अंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील उदयोन्मुख खेळाडूंना अद्यावत कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हयाच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र स्थापन करुन या केंद्राना नियमित स्वरुपात आर्थिक सहाय्य देण्यात येते. याकरिता (1) क्रीडा साहित्य व क्रीडा प्रशिक्षण उपक्रम, २)अंशकालीन मैदानसेवक मानधन, ३) क्रीडा विषयक वाड्:मय, सीडी, पुस्तके, नियतकालिके, मासिके इ. ४) कार्यालयीन/सादिल खर्च, ५) अशासकीय प्रशिक्षकास मानधन, ६) क्रीडा मार्गदर्शक गणवेश, ७) क्रीडा मार्गदर्शक प्रवास खर्च, ८) क्रीडा प्रशिक्षण शिबीराचा खर्च असे बाबनिहाय अनुदान उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हयामध्ये कार्यरत असलेल्या क्रीडा मार्गदर्शकांनुसार उपलब्ध खेळांच्या प्रशिक्षण केंद्रास मान्यता देण्यात येते.
संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी
7
राज्याचे क्रीडा धोरण,2012-अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना
1. शासन संचालीत क्रीडा प्रबोधिनी आहेत त्या ठिकाणी प्राधान्याने अनिवासी क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. 2. वसतीगृहात न राहता क्रीडा प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या राज्य/राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंना प्राधान्याने कौशल्य चाचणी घेऊन प्रवेश देण्यात येतो. इतर उदयोन्मुख खेळाडूंना त्यांच्या क्रीडा प्रकारानुसार विविध कौशल्याची चाचणी घेण्यात येऊन पात्रतेनुसार प्रवेश देण्यात येतो. 3. अनिवासी क्रीडा प्रबोधिनीत प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी स्पर्धा सहभाग खर्च, क्रीडा गणवेश, क्रीडा साहित्य, पौष्टिक आहार, तज्ज्ञ प्रशिक्षक, क्रीडा सुविधा इ. पुरविण्यात येतात. 4. तसेच शासन निर्णयातील विहित अटी शर्तीनुसार व संबधित क्रीडा प्रकाराच्या सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या नोंदणीकृत संस्थांना शासनस्तरावर गठीत समितीच्या मान्यतेने अनिवासी क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यास मंजुरी देण्यात येते.
जिल्हा क्रीडा अधिकारी (प्राचार्य,क्रीडा प्रबोधिनी)-पुणे,कोल्हापूर,सांगली, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, अहमदनगर,औरंगाबाद व गडचिरोली; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी
8
जिल्हा क्रीडा पुरस्कार
जिल्हा क्रीडा पुरस्कार :- जिल्हयातील गुणवंत क्रीडापटू, दिव्यांग खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा कार्यकर्ता यांच्या कार्याचे/योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. दरवर्षी गुणवंत खेळाडू दोन पुरस्कार (१ महिला, १ पुरुष), दिव्यांग खेळाडू एक, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक एक पुरस्कार व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता एक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई अजिंक्यपद स्पर्धा, राष्ट्रकूल अजिंक्यपद स्पर्धा, युथ ऑलिंपिक या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूस जिल्हा क्रीडा पुरस्कार थेट देण्यात येतो व असा पुरस्कार ज्यादाचा पुरस्कार समजला जातो. पुरस्काराचे स्वरुप :- प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रु. १०,०००/- अर्जाचा विहीत नमुना संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे प्राप्त होईल
संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी
9
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012- व्यायामशाळा विकास अनुदान योजनेत सुधारणा-सुधारित नियमावली.
तरूण पिढीमध्ये व्यायामाची आवड निर्माण करून शरीर सुदृढ व निरोगी करण्यात व्यायामशाळा, तालिमी व आखाडे या संस्थाचा मोठा वाटा आहे. राज्यात अशा व्यायाम संस्था मोठ्या प्रमाणात स्थापन करणे तसेच आधुनिक व्यायाम साहित्य उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
10
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012 - जिल्हास्तरीय क्रीडागंण विकास अनुदान योजनेत सुधारणा.
राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना त्यांचे कौशल्य व क्रीडा गुण विकसित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुयोग्य क्रीडागंणाची मुलभूत सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण व्हावी, या उद्देशाने क्रीडागंण विकासासाठी अनुदान देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी
योजनेशी संबंधित तपशील
अनुक्रमांक
वर्णन
नस्तीचा प्रकार
फाईल / URL
तारीख
1
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत नियमावली.
URL
20 डिसें 2018
2
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत.
URL
25 जाने 2019
योजनेशी संबंधित तपशील
अनुक्रमांक
वर्णन
नस्तीचा प्रकार
फाईल / URL
तारीख
1
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण-2012- शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या शाळांना अनुदान.
URL
26 फेब्रु 2014
योजनेशी संबंधित तपशील
अनुक्रमांक
वर्णन
नस्तीचा प्रकार
फाईल / URL
तारीख
1
इयता 11 वी चे प्रवेश देताना कला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विदयार्थ्यांना अनुक्रमे 2 टक्के व 3 टक्के जागा राखून ठेवण्याबाबत.
URL
25 मार्च 2010
2
इयता 11 वी चे प्रवेश देताना क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विदयार्थ्यांना 5 टक्के जागा राखून ठेवण्याबाबत.
PDF
26 जून 2008
3
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी ) व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत नियमावली.
URL
20 डिसें 2018
योजनेशी संबंधित तपशील
अनुक्रमांक
वर्णन
नस्तीचा प्रकार
फाईल / URL
तारीख
1
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण, २०१२- शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन.
URL
24 डिसें 2014
योजनेशी संबंधित तपशील
अनुक्रमांक
वर्णन
नस्तीचा प्रकार
फाईल / URL
तारीख
1
राज्याचे क्रीडा धोरण,2012- क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
URL
28 एप्रि 2014
योजनेशी संबंधित तपशील
अनुक्रमांक
वर्णन
नस्तीचा प्रकार
फाईल / URL
तारीख
1
जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यास मान्यता
URL
22 मे 2014
योजनेशी संबंधित तपशील
अनुक्रमांक
वर्णन
नस्तीचा प्रकार
फाईल / URL
तारीख
1
राज्याचे क्रीडा धोरण,2012-अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना
URL
21 सप्टें 2013
योजनेशी संबंधित तपशील
अनुक्रमांक
वर्णन
नस्तीचा प्रकार
फाईल / URL
तारीख
1
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली
URL
14 नोव्हें 2022
2
Sports policy of Maharashtra State 2012-Modification in Gymnasium Development Grant Scheme- Revised Rules
URL
26 फेब्रु 2019
योजनेशी संबंधित तपशील
अनुक्रमांक
वर्णन
नस्तीचा प्रकार
फाईल / URL
तारीख
1
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012- व्यायामशाळा विकास अनुदान योजनेत सुधारणा-सुधारित नियमावली.
URL
08 जाने 2019
2
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012- व्यायामशाळा विकास अनुदान योजनेत सुधारणा-सुधारित नियमावली.
URL
26 फेब्रु 2019
योजनेशी संबंधित तपशील
अनुक्रमांक
वर्णन
नस्तीचा प्रकार
फाईल / URL
तारीख
1
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012 - जिल्हास्तरीय क्रीडागंण विकास अनुदान योजनेत सुधारणा.