INTRODUCTION_BANNER_WC

YOUTH_STATE_LEVEL_SCHEME_WC

राज्यस्तरीय युवा योजना
अनुक्रमांक योजनेचे नांव वर्णन संपर्काची माहिती अर्जाचा नमुना योजनेशी संबंधित तपशील
1 औरंगाबाद येथील वसतीगृहास वित्तीय सहाय्य. देशी व विदेशी युवकांना निवास व भोजन व्यवस्था अल्पदरात उपलब्ध व्हावी आणि विचारांचे आदान-प्रदान करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सहभागाद्वारे राज्यात औरंगाबाद येथे युवक वसतीगृह स्थापन करण्यात आलेले आहेत. युवक वसतीगृह स्थापन करण्यासाठी राज्य शासनामार्फत २ एकर शासकीय जमीन करारावर नाममात्र भाड्याने उपलब्ध करुन दिल्यानंतर केंद्र शासनामार्फत वसतीगृहाचे बांधकाम करण्यात येते. वसतीगृहाचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र शासनाकडून वार्डन व सहाय्यक वार्डन यांची नियुक्ती केली जाते. तथापी कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, प्रवासखर्च, कार्यालयीन खर्च वसतीगृह इमारतीची देखभाल व दुरुस्ती इत्यादीवरील खर्च राज्यशासनामार्फत करण्यात येतो. विभागीय उपसंचालक औरंगाबाद विभाग, औरंगाबाद व युवा वसतीगृह, स्टेशन रोड, पद्मपुरा, बाबा पेट्रोल पंप जवळ, औरंगाबाद
2 स्वयंसिध्दा महिला स्वसरंक्षण प्रशिक्षण कार्यक्रम. महाराष्ट्र शासनाने 2001 मधील क्रीडा धोरणामध्ये 'खेळाद्वारे सर्वासांठी सुदृढता' या तत्वानुसार महिलांकरिता स्वयंसिध्दा स्वंसरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे. सन 2003 पासून शासनाच्या क्रीडा विभागामार्फ़त महिलांसाठी स्वसंरक्षणाची निर्भय योजना राबविण्यात येत आहे.सदर योजने अतंर्गत जिल्हास्तर,विभागस्तर व राज्यस्तरावर प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून प्रशिक्षणार्थी मास्टर ट्रेनर्स तयार करण्यात येतात. या ट्रेनर्सने जिल्हयात जाऊन लाभार्थी घडविणे हा उद्देश आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
3 राज्याचे युवा धोरण-2012 - युवा महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत. राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी जिल्हा/राज्य/राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये 13 ते 35 या वयोगटातील युवकांचा समावेश असतो. या महोत्सवामध्ये लोकनृत्य,लोकगीत,एकांकिका (इंग्रजी/हिंदी),शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी) शास्त्रीय नृत्य,सितार, बासरी, तबला, वीणा,मृदंग,हार्मोनियम (लाईट)गिटार,मणिपुरी नृत्य,ओडिसी नृत्य,भरतनाटयम्, कथ्थक, कुचिपुडी नृत्य,वक्तृत्व इ.बाबींचा समावेश असतो. या योजनेतंर्गत प्रति जिल्हा रु.75,000/- व प्रति विभाग रु.1.25 लाख इतकी तरतूद देण्यात येते. तसेच राष्ट्रीयस्तरावर संघ पाठविण्याकरिता रु.13.75 लाख इतकी तरतूद करण्यात येते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
4 राज्याचे युवा धोरण-2012 - युवा वसतीगृहाची स्थापना. युवांना नोकरी, व्यवसाय, शिक्षण, मुलाखती, मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी वेळोवेळी शहरांमध्ये जावे लागत असून, त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या निवासासाठी हक्काचे असे ठिकाण उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने राज्यातील सहा महसुल विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी रु.४००.०० लक्ष इतक्या अनुदानाच्या मर्यादेत अद्ययावत अशा युवा वसतीगृहाची स्थापना करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतलेला आहे. सदर योजनेतंर्गत युवा वसतिगृहाची स्थापना करण्याकरिता औरंगाबाद रु.4.00 कोटी, मुंबई रु.1.88 कोटी,नाशिक रु.3.70 कोटी, नागपूर रु.3.70कोटी, अमरावती रु.3.80 कोटी, पुणे रु.233.60 कोटी इतकी तरतूद वितरीत करण्यात आलेली आहे. संबंधित विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
5 युवा नेतृत्व व व्यक्तिमत्व विकासासाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे. राज्यात प्रतिवर्षी १३ ते ३५ वयोगटातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हास्तर युवा पुरस्कार प्राप्त केलेल्या एका युवक व युवतीसाठी युवा नेतृत्व व व्यक्तिमत्व विकासासाठी सदर योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. १५ दिवसांच्या 6 निवासी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन 8 विभागातील जिल्हयांमध्ये करण्याचे प्रयोजन आहे. यासाठी प्रति शिबिर रु.3.15 लाख इतकी तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
6 राज्याचे युवा धोरण,2012 - राज्य युवा प्रशिक्षण केंद्राची स्थापना. राज्यातील युवांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करुन देऊन या स्पर्धेच्या युगात शक्तीशाली स्पर्धक म्हणून पुढे आणण्याच्या उद्देशाने युवा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. प्रशिक्षण केंद्र युवांच्या गरजा ओळखून त्या गरजांच्या पूर्ततेकरिता शिका, नेतृत्व करा,व योगदान द्या या सिद्धांतानुसार कार्यरत राहील. सदर केंद्रामार्फत शिक्षण,युवा सक्षमीकरणाकरिता विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा व सेमिनार इ.आयोजन करण्यात येते. तसेच संशोधन सल्ला व सहाय्य या बाबीवर लक्ष केंद्रीत करण्यात येते.सदर योजनेकरिता 13 ते 35 वयोगटातील युवक/युवती हे लाभार्थी असतील.या केंद्राद्वारे आयोजित कार्यक्रमाची माहिती राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत युवा मंडळे /संस्था यांचेपर्यत पोहचविण्यात येते. संबंधित संस्थांकडून त्यांच्या संस्थेत कार्यरत असलेल्या युवांची नांवे मागविण्यात येतात व कार्यक्रम समितीमार्फत विविध उपक्रमाकरीता प्रशिक्षणार्थीची निवड केली जाते.सदर केंद्राच्या ठिकाणी वर्षभर विविध प्रकारच्या 50 प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन या केंद्राच्या माध्यमातून करणे अपेक्षित आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
7 राज्याचे युवा धोरण-2012 - राज्य युवा विकास निधीची स्थापना राज्यात जिल्हास्तरावर युवा विकासाचे उपक्रम परिणामकारकरित्या राबविण्यासाठी तसेच राज्यातील उदयोन्मुख युवांना वृद्धिंगत होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन व आर्थिक सहाय्य देण्याची गरज लक्षात घेऊन राज्य युवा विकास निधीची स्थापना करण्यात आली आहे. सदर योजनेच्या निधीतून युवा मेळावे, कार्यशाळा, चर्चासत्र, युवा परिषद यांचे आयोजन करणे, तसेच सामाजिक कार्यात कार्य करणाऱ्या युवक, युवती व संस्था यांना आर्थिक सहाय्य करणे, इ. उपक्रम राबविण्यात येतात. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे ; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी