INTRODUCTION_BANNER_WC

YOUTH_SCHEME_WC

वैयक्तिक लाभाच्या युवा योजना
अनुक्रमांक योजनेचे नांव वर्णन संपर्काचा तपशील अर्जाचा नमुना लाभार्थ्यांची यादी योजनेशी संबंधित तपशील
1 राज्याचे युवा धोरण-2012 - राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार देण्याबाबत राज्यातील /जिल्हयातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी 13 ते 35 या वयोगटामधील युवक/युवतींना राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रतिवर्षी देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. पुरस्काराचे स्वरूप- 1. जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर एका युवक,एक युवती व एक नोदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. सदरचा पुरस्कार गौरवपत्र,सन्मान चिन्ह,रोख रक्कम रु १०,०००/- (प्रति युवक व युवतीसाठी) प्रति संस्थेस गौरवपत्र, सन्मानचिन्ह,रोख रक्कम रु.५०,०००/- अशा स्वरूपाचा असेल. 2. राज्यस्तरावर युवा पुरस्कार क्रीडा विभागाचे क्षेत्रिय विभागानुसार प्रत्येक विभागातील एक,युवक,एक युवतीस व एका नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. सदरचा पुरस्कार गौरवपत्र,सन्मानचिन्ह युवक व युवतीस रोख रु.५०,०००/-तर संस्थेस रोख पारितोषिक रु.१.00लाख अशा स्वरूपाचा असेल. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.