INTRODUCTION_BANNER_WC

SPORTS_STATE_LEVEL_SCHEME_WC

राज्यस्तर क्रीडा योजना
अनुक्रमांक योजनेचे नांव वर्णन संपर्काचा तपशील अर्जाचा नमुना योजनेशी संबंधित तपशील
1 राज्य क्रीडा पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार : ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक, कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा ज्या व्यक्तींनी क्रीडा व खेळासाठी आपले सर्वस्व पणाला लावून आपले जीवन क्रीडा विकासासाठी व्यतित केले आहे अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षीचा गौरव करण्याच्या दृष्टीने शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. दरवर्षी केवळ एकाच व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे.
2 स्व.खाशाबा जाधव चषक राज्यस्तर कुस्ती स्पर्धा महाराष्ट्रातील उदयोन्मुख खेळाडूंना राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध होऊन त्याद्वारे प्रेरणा मिळावी कुस्तीप्रेमी प्रेक्षकांना दर्जेदार खेळाडूंचे कौशल्य व खेळ पहाण्याची संधी मिळावी तसेच ऑलिंपिक पदक विजेते स्व.खाशाबा जाधव यांच्या कामगिरीचा गौरव म्हणून दरवर्षी राज्यस्तरावर स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनासाठी आयोजक जिल्हयास रु.50.00 लक्ष इतका निधी उपलब्ध करुन दिला जातो. या निधी मधून रोख रक्कमेची बक्षिसे, खेळाडू, व्यवस्थापक, मार्गदर्शक तसेच सामनाधिकारी यांचा निवास, भोजन, प्रवास खर्च इ.बाबींवर खर्च केला जातो. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे़; संबंधित विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा
3 छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा महाराष्ट्रातील उदयोन्मुख खेळाडूंना राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध होऊ त्याद्वारे प्रेरणा मिळावी तसेच व्हॉलीबॉल प्रेमी प्रेक्षकांना दर्जेदार खेळाडूंचे कौशल्य व खेळ पहाण्याची संधी मिळावी यासाठी दरवर्षी राज्यस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनासाठी आयोजक जिल्हयास रु.50.00 लक्ष इतका निधी उपलब्ध करुन दिला जातो. या निधीमधून रोख रक्कमेची बक्षिसे, खेळाडू, व्यवस्थापक, मार्गदर्शक तसेच सामनाधिकारी यांचा निवास, भोजन, प्रवास खर्च इ.बाबीवर खर्च केला जातो. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे ; संबंधित विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा.
4 छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर कबड्डी स्पर्धा महाराष्ट्रातील उदयोन्मुख खेळाडूंना राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध होऊ त्याद्वारे प्रेरणा मिळावी तसेच कबड्डीप्रेमी प्रेक्षकांना दर्जेदार खेळाडूंचे कौशल्य व खेळ पहाण्याची संधी मिळावी यासाठी दरवर्षी राज्यस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनासाठी आयोजक जिल्हयास रु.50.00 लक्ष इतका निधी उपलब्ध करुन दिला जातो. या निधीमधून रोख रक्कमेची बक्षिसे, खेळाडू, व्यवस्थापक, मार्गदर्शक तसेच सामनाधिकारी यांचा निवास, भोजन, प्रवास खर्च इ.बाबींवर खर्च केला जातो. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे; संबंधित विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा.
5 शासनाच्या 5टक्के व 2टक्के स्वेच्छाधिकार कोटयातून सदनिका वाटप करण्याबाबतचे सर्वसमावेश धोरण. राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रसार,प्रचार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असण्याच्या दृष्टीने, पद्म पुरस्कार विजेते खेळाडू तसेच ऑलिंपिक, आशियाई तसेच राष्ट्रकुल या आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील पदक विजेत्या खेळाडूंना शासनाच्या 5टक्के व 2टक्के स्वेच्छाधिकार कोटयातून सदनिका वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सदर योजनेअंतर्गत शासनाच्या नगर रचना विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येते तसेच या योजनेअंतर्गत पात्र खेळाडूंना पात्रता प्रमाणपत्र क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून देण्यात येते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे.
6 राज्याचे क्रीडा धोरण,2012- राज्यस्तरावर क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन,प्रचार,प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहे. राज्याच्या ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंच्या क्रीडा विषयक कामगिरीमुळे देशाच्या व राज्याच्या नावलौकीकात भर पडत आहे. खेळाडू घडविण्यासाठी खेळाच्या पायाभूत सुविधा, क्रीडा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन, सराव व प्रशिक्षणसाठी पुरेसे साहित्य, प्रशिक्षणाचा कृती आराखडा, खेळातील कौशल्यांवर प्रभुत्व येण्यासाठी सराव, नियमित प्रशिक्षण, स्पर्धा, खेळाडूंच्या सकारात्मक मानसिकतेसाठी मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आहार तज्ज्ञ, मसाजिस्ट, दुखापतींवर इलाजासाठी फिजीओथेरापीस्ट इ. बाबींचे मार्गदर्शन खेळाडूंना पुरविण्यासाठी राज्यस्तर क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे; संबंधित विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
7 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2001-महाराष्ट्र स्पोर्टस इन्फ्रास्ट्र्क्चर डेव्हलपमेंट प्लॅन अंतर्गत क्रीडा सुविधा निर्माण करणे. (विभागीय/जिल्हा/तालुका क्रीडा संकुल बांधकाम योजना) महाराष्ट्रात क्रीडा संस्कृतीची जोपासना करुन ती विकसित करण्यासाठी विभाग, जिल्हा व तालुका क्रीडा संकुलांची उभारणी करुन त्या ठिकाणी विविध खेळांच्या सुविधा विकसित करण्यात येत आहेत. विभागीय क्रीडा संकुल - राज्याच्या ९ विभागामध्ये आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण करण्याकरिता प्रत्येक विभागासाठी रु.24.00 कोटी अनुदान अनुज्ञेय आहे. जिल्हा क्रीडा संकुल - राज्यातील प्रत्येक जिल्हयामध्ये राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण करण्याकरिता रु.8.00 कोटी अनुदान अनुज्ञेय आहे. तालुका क्रीडा संकुल - राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये विविध खेळाच्या किमान सुविधा निर्माण करण्याकरिता रु.1.00 कोटी अनुदान अनुज्ञेय आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे
8 राज्याचे क्रीडा धोरण,2012- क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. खेळामधील बदलेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती, नवीन खेळ, खेळांची शास्त्रेाक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना होणे आवश्यक आहे. तालुका,जिल्हा,विभाग व राज्यस्तरावर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रात होणारे बदल अवगत होण्यासाठी प्रती जिल्हा निवडक 10 क्रीडा शिक्षक यांना माटर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात येते. मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षत क्रीडा शिक्षक हे त्यांच्या संबधित जिल्हयामध्ये जिल्हास्तरीय शिबिरामध्ये मार्गदर्शन करतात. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे.
9 क्रीडा प्रबोधिनी आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरविण्याच्या हेतूने शासनाने शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे, कोल्हापूर, सांगली, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, प्रवरानगर, औरंगाबाद व गडचिरोली अशा 11 ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना केली असून, या 11क्रीडा प्रबोधिनींमध्ये ज्युदो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल,जलतरण, ॲथलेटिक्स, कुस्ती,बॅडमिंटन,आर्चरी, हॅन्डबॉल,टेबल टेनिस, वेटलिफिटंग, ट्रायथलॉन, सायकलिंग व बॉक्सींग अशा 16 क्रीडा प्रकारात मार्गदर्शन केले जाते. क्रीडा प्रबोधिनी प्रवेश. 1.बॅटरी ऑफ टेस्ट चे आयोजन तालुका व जिल्हास्तरावर संबंधित जिल्हयातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचेमार्फत मुला-मुलींसाठी उंची,वजन,३० मी.भरधाव धावणे,उभे राहून लांब उडी,८०० मी. धावणे,उभी उंच उडी,६x१० मी. शटल रन,लवचिकता व मेडिसीन बॉल थ्रो या प्रत्येकी ३ गुणांच्या ९ चाचण्यांचे आयोजन केले जाते.या चाचण्यातून किमान २७ गुणांपैकी १७ गुण किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त गुण प्राप्त करणा-या विदयार्थ्यांची गुणानुक्रमे एकूण उपलब्ध जागेच्या २०टक्के एवढया मर्यादित जागेपर्यंत निवड करुन वैद्यकीय तपासणीसाठी बोलविण्यात येते. वैद्यकीय तपासणी अहवालानुसार प्रशिक्षणार्थींची अंतिम प्रवेशासाठी निवड करुन क्रीडा प्रबोधिनीसाठी प्रवेश निश्चित केला जातो. 2.सरळ प्रवेश प्रक्रिया : क्रीडा प्रबोधिनीमध्ये असलेल्या खेळांमध्ये राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडूंना सरळ प्रवेश चाचणीसाठी एकूण उपलब्ध जागेच्या ४०टक्के पात्र खेळाडूंना प्रवेश देण्यात येतो. 3.खेळनिहाय कौशल्य चाचणी : क्रीडा प्रबोधिनीमध्ये असलेल्या खेळांमध्ये राज्यस्तरावर सहभागी झालेल्या खेळाडूंची कौशल्य चाचणी घेऊन क्रीडा प्रबोधिनीत एकूण उपलब्ध जागेच्या ४०टक्के पात्र खेळाडूंना प्रवेश देण्यात येतो. पुणे येथे क्रीडा प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थींसाठी स्वतंत्र शाळा कार्यरत असून, इतर १० क्रीडा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांसाठी स्थानिक उत्तम शाळेत शिक्षण दिले जाते. सर्व प्रशिक्षणार्थींना विविध खेळांचे तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकांकडून तंत्रशुध्द प्रशिक्षण दोन सत्रात दिले जाते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे; विभागीय उपसंचालक (प्राचार्य,क्रीडा प्रबोधिनी)-नागपूर व औरंगाबाद; जिल्हा क्रीडा अधिकारी (प्राचार्य, क्रीडा प्रबोधिनी)- पुणे, अमरावती,कोल्हापूर, सांगली, अकोला,नाशिक,अहमदनगर,गडचिरोली व ठाणे.
10 राज्य क्रीडा पुरस्कार. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी): क्रीडा क्षेत्रातील साहसी उपक्रमामध्ये सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी करणा-या त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीने महाराष्ट्राच्या क्रीडा लौकिकात भर टाकणा-या सुयोग्य व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. दरवर्षी केवळ एकाच व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे
11 राज्य क्रीडा पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) : क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंचा गौरव करण्याच्या दृष्टीने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. दरवर्षी एक पुरुष व एक महिला खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येतो. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे.
12 राज्य क्रीडा पुरस्कार. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) : क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील खेळाडूंचा गौरव करण्याच्या दृष्टीने पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्रतिवर्षी एका खेळात एक महिला व एक पुरुष खेळाडूंची पुरस्कारासाठी निवड केली जाते.(शासन निर्णयामध्ये नमुद केलेल्या ३९ खेळांमधील) ऑलिंपिक/जागतिक क्रीडा स्पर्धा-सहभाग,एशियन गेम्स/कॉमनवेल्थ गेम्स-प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक.तसेच केंद्र शासनाकडून अर्जुन पुरस्कार प्राप्त झाल्यास शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार थेट पध्दतीने प्रदान करण्यात येतो.तो जादाचा पुरस्कार समजण्यात येतो. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे.
13 राष्ट्रीय छात्र सेना सन 1948-49 मध्ये देशव्यापी स्वरुपात राष्ट्रीय छात्र सेना दलाची स्थापना शिक्षण संस्थेमधील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी झाली. महाराष्ट्रात सन 1972-73 च्या शैक्षणिक वर्षापासून सुरु झालेल्या 10 + 2 + 3 हया बदललेल्या शिक्षण पध्दतीनुसार राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविदयालय स्तरावरील अभ्यासक्रमात ऐेच्छिक विषयाखालील एक उपक्रम म्हणून अंतर्भाव करण्यात आला आहे. राज्यामध्ये राष्ट्रीय छात्र सेना अंतर्गत 7 गटप्रमुख, गट मुख्यालय व 60 समादेशक अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत, राज्यामध्ये राष्ट्रीय छात्र सेना कार्यालयाच्या अधिपत्याखाली विद्यालये/ महाविद्यालयांमध्ये वरिष्ठ व कनिष्ठ विभागाच्या छात्रांसाठी प्रशिक्षण देण्यात येते. राष्ट्रीय छात्र सेनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 829 शाळांमध्ये,541 महाविद्यालयांमध्ये तसेच 20 विद्यापीठांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते केंद्र व राज्य शासनाकडून संयुक्तपणे राष्ट्रीय छात्र सेनेचे विविध उपक्रम उदा.- प्रजासत्ताक दिन परेड (कॅम्प), भूदल सैनिक कॅम्प, आर्मी ॲटॅचमेंट कॅम्प, ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प, वायु सैनिक कॅम्प, नौसैनिक कॅम्प, ॲडव्हान्स लिडरशिप कॅम्प, नॅशनल इंटीग्रेशन कॅम्प,रॉक क्लाईंबिंग कॅम्प, ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प, शिप ॲटॅचमेंट कॅम्प, स्पेशल नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प, कंम्बाइंड ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प, बेसिक लिडरशिप कॅम्प, एनसीसी डे साजरा करणे इ. उपक्रम राबविण्यात येतात क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे.
14 कै.भाई नेरुरकर चषक राज्यस्तर खो-खो स्पर्धा. महाराष्ट्रातील उदयोन्मुख खेळाडूंना राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध होऊन त्याद्वारे प्रेरणा मिळावी तसेच खो खो प्रेमी प्रेक्षकांना दर्जेदार खेळाडूंचे कौशल्य व खेळ पहाण्याची संधी मिळावी यासाठी दरवर्षी राज्यस्तरावर कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तर खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनासाठी आयोजक जिल्हयास रु.50.00 लक्ष इतका निधी उपलब्ध करुन दिला जातो. या निधीमधून रोख रक्कमेची बक्षिसे, खेळाडू, व्यवस्थापक, मार्गदर्शक तसेच सामनाधिकारी यांचा निवास, भोजन, प्रवास खर्च इ.बाबींवर खर्च केला जातो. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे; संबंधित विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा
15 महाराष्ट्रातील द्रोणाचार्य, अर्जुन, शिवछत्रपती व दादोजी कोंडदेव पुरस्कारार्थींना महाराष्ट्र राज्यांतर्गत विनामुल्य एस.टी. प्रवास सवलत देण्याबाबत राज्यातील अधिकाधिक तरुण तरुणींना खेळाकडे आकृष्ट करण्यासाठी व राज्यातील खेळाडूंचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार व शिवछत्रपती पुरस्कारार्थींना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसमधून राज्यांतर्गत विनामुल्य प्रवास करण्यासाठीची योजना आहे. या सवलतीसाठी पुरस्कारार्थींना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्वसाधारण/निमआराम/आराम गाडयातून प्रवास करण्यास अनुमती असेल. प्रत्येक पुरस्कारार्थींमागे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ओळखपत्रांच्या संख्येनुसार शासनाच्या क्रीडा ‍विभागाने प्रतिवर्षी कमाल रु.पाचशे या दराने प्रतिपूर्ती करावी. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे
16 राज्य क्रीडा पुरस्कार. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व जिजामाता पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक):- महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रामध्ये मार्गदर्शनपर अतुलनीय कामगिरी बजावून खेळाडूंना घडवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यास उद्युक्त केले असेल अशा क्रीडा मार्गदर्शकांचा सन्मान करणे तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा दर्जा वाढवून राज्याचा लौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांना उत्तेजन देण्यासाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार दिला जातो. महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकांमधून निवड झालेल्या महिला क्रीडा मार्गदर्शकास देण्यात येणारा पुरस्कार हा जिजामाता पुरस्कार म्हणून गणण्यात येईल. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे.
17 साहसी क्रीडा प्रकारातील गिर्यारोहण, माऊंटनिअरींग, स्किईंग, स्नोबोर्डींग, पॅरासेलिंग, हवाई क्रीडा स्पर्धा (हँगग्लायडींग, पॅराग्लायडींग), जलक्रीडा आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी सुधारित नियम व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत. राज्यामध्ये बऱ्याच संस्था गिर्यारोहण व माउंटनिअरींगच्या सहली/मोहिमा आयोजित करत आहेत.या संस्थाकडे या क्षेत्रातील प्रशिक्षीत सहयोगी नसतात. या संस्था ट्रेकींगला जाणाऱ्या तुकडयांच्या सुरक्षितेबाबत पुरेशी व्यवस्था करीत नाहीत, अशा मोहिमा/सहलीमध्ये ट्रेकर्स बरोबर डॉक्टर नसतात अथवा असले तरी त्यांचेकडे पुरेशी वैद्यकीय साधन सामुग्री नसते. बऱ्याचशा संस्था या क्षेत्रात अप्रशिक्षित आहेत. राज्यातील एका संस्थेमार्फत हिमालयामध्ये ट्रेकिंग करीता गेलेल्या एका मुलाचा श्वासनाचा त्रास उदभवून अपघाती मृत्यू झाला. त्या संदर्भात त्याच्या पालकांनी मा.उच्च न्यायालय,मुंबई येथे जनहित याचिका क्र.184/2007 दाखल केली होती. या याचिकेबाबत मा.उच्च न्यायालयाने दि.12.07.2013 रोजी दिलेल्या सूचना विचारात घेऊन साहसी क्रीडा प्रकारांना आळा घालण्यासाठी क्रीडा प्रकारातील ट्रेकींग, माउंटनिअरींग, स्किईग, स्नोर्बोडींग, पॅरासेलिंग, हॅग्लायडींग, जल क्रीडा इ.आयोजन करणाऱ्या संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना शासनाने निर्गमित केल्या आहेत. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे
18 अश्वमेध क्रीडा स्पर्धा (क्रीडा महोत्सव), आंतरविद्यापीठ क्रीडास्पर्धांचे आयोजन. राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. खेळाच्या तसेच क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे, सामाजिक एकोपा,मनोरंजन यासाठी खेळ आवश्यक आहे. क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून खेळाच्या विकासाला चालना देता येणे शक्य आहे. विविध स्पर्धांचे आयोजन केल्याने क्रीडा संस्कृतीच्या वाढीस पूरक वातावरण तयार होईल. महाराष्ट्र राज्यात आंतरविद्यापीठ स्तरावर आयोजित होणारी अश्वमेध क्रीडा स्पर्धा (क्रीडा महोत्सव) ही सन 1997 पासून दरवर्षी आयोजित केली जाते. या स्पर्धांद्वारे मोठया प्रमाणावर सामाजिक विषयांबाबत जनजागृती करणे हा या योजनेचा उद्देश आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे.
19 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012 - तालिम, कुस्ती केंद्राचा विकास करण्याबाबत. महाराष्ट्रात कुस्ती कलेची परंपरा जोपासण्यासाठी तालमी व आखाड्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ग्रामीण व शहरी भागात कुस्ती खेळाची विशेष आवड आहे. हा खेळ प्रामुख्याने माती व गादी विभागात खेळला जातो. ग्रामीण भागात मातीचा आखाडा / तालमी व शहरी भागात तालमी कुस्ती केंद्र यांची विशेष ओळख सर्वत्र आहे. कुस्तीच्या तंत्रात झालेले बदल लक्षात घेऊन आखाडा/तालमीचे आधुनिकीकरण करणे गरजेचे असल्याची भावना राज्यातील कुस्तीपटूंनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. कुस्तीसारखा पारंपारिक क्रीडा प्रकार जिवंत ठेवण्याकरीता अशा क्रीडा संस्थांना आधुनिक सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
20 राज्य क्रीडा संघटनाना प्रोत्साहनात्मक अनुदान. राष्ट्रीय स्पर्धात महाराष्ट्राचे संघ विविध खेळात नेत्रदिपक कामगिरी बजावित असतात. परंतु त्यांच्या या कार्याचे योग्य मूल्यमापन होत नाही. तसेच राज्य संघटनेच्या आर्थिक कमकुवत परिस्थितीमुळे त्या त्या खेळांचा मोठया प्रमाणावर प्रचार व प्रसार करणे त्यांना शक्य होत नाही. या गोष्टीचा साकल्याने विचार करुन हे प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते. या अनुदानाचा उपयोग संबंधित राज्य संघटनेने राज्यात खेळाचा विकास करण्याकरिता करणे आवश्यक आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी
21 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,1996 - अधिकृत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचा संघ सहभागी होण्यासाठी राज्य संघटनांना आर्थिक सहाय्य. महाराष्ट्रातील गुणवान खेळाडूंना विविध खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धात राज्याचे प्रतिनिधित्व करणे सुलभ व्हावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सदरहू योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेतंर्गत संबंधित राज्य संघटनांना राज्याचे संघ, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी करण्यासाठी प्रोत्साहित करणे व आर्थिकदृष्टया सक्षम नसणाऱ्या संघटनांना राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांना अर्थिक मदत करण्यात येते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
22 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,1996 - राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यासाठी अधिकृत राज्य संघटनांना आर्थिक सहाय्य क्रीडा संस्कृतीची जोपासना व वाढ करण्यामध्ये विविध खेळांच्या क्रीडा संघटनांचा महत्वाचा वाटा आहे. या संघटनांना अधिक बळकट करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन, राज्याच्या क्रीडा धोरणानुसार विविध खेळांच्या अधिकृत राज्य संघटनांना राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
23 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,1996 - महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून आर्थिक सहाय्य.- महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद मार्फत क्रीडा संस्थांना मान्यता देणे. महाराष्ट्र राज्यात क्रीडा व खेळांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या एकविध खेळाच्या राज्य, विभाग, जिल्हा संघटना, क्रीडा संस्था, क्रीडा मंडळे तसेच इतर कार्यक्रमाबरोबर क्रीडा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांना महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेमार्फत मान्यता क्रमांक देणे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
24 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,1996 - महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून आर्थिक सहाय्य.- अधिकृत राज्य/राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी अनुदान महाराष्ट्र राज्यात क्रीडा व खेळांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या एकविध खेळाच्या राज्य संघटना, जिल्हा संघटना, क्रीडा संस्था, क्रीडा मंडळे तसेच इतर कार्यक्रमाबरोबर क्रीडा विकासाचे कार्य करणा-या संस्थांना अधिकृत राज्य/राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून अनुदान देण्यात येते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
25 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,1996 - महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून आर्थिक सहाय्य.- क्रीडा संस्थांना आर्थिक सहाय्य. महाराष्ट्र राज्यात क्रीडा व खेळांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या एकविध खेळाच्या राज्य व जिल्हा संघटना, क्रीडा संस्था, क्रीडा मंडळे तसेच इतर कार्यक्रमाबरोबर क्रीडा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांना महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून आर्थिक सहाय्य खालील प्रकारामध्ये देण्यात येते. अ) निर्वाह अनुदान. ब) क्रीडा साहित्य खरेदीसाठी अनुदान. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
26 राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण. या योजने अंतर्गत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील प्राविण्य प्राप्त खेळाडूंच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करून देण्यात येते. शासकीय/निमशासकीय क्षेत्रामधील खेळाडूंसाठी आरक्षित असलेल्या पदावर खेळाडू या पडताळणी प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज करु शकतो व या पडताळणी प्रमाणपत्राच्या आधारे खेळाडूस ५ टक्के आरक्षणाअंतर्गत नियुक्तीसाठी पात्र ठरतो. खेळाडू ज्या विभागातील रहिवाशी आहे, त्या विभागाच्या विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून खेळाडूंना त्याच्या क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी करुन पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येते. ऑलिम्पिक गेम्स /एशियन गेम्स / कॉमनवेल्थ गेम्स या स्पर्धेत समावेश असलेले खेळ आणि खो-खो, कबड्डी, बुध्दीबळ व मल्लखांब या देशी खेळांचा समावेश या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 अंतर्गत आपले सरकार (https://aaplesarkar.maharashtra.gov.in) या वेबपोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर, सदर योजनेचा अर्ज ऑनलाईन उपलब्ध होईल. संबंधित विभागीय उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा.