INTRODUCTION_BANNER_WC

SPORTS_SCHEME_WC

वैयक्तिक लाभाच्या क्रीडा योजना
अनुक्रमांक योजनेचे नांव वर्णन संपर्काचा तपशील अर्जाचा नमुना लाभार्थ्यांची यादी योजनेशी संबंधित तपशील
1 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण-2012- राष्ट्रीय स्तरावर शालेय, ग्रामीण (पायका) व महिला क्रीडा स्पर्धेत सहभागी राज्यातील खेळाडूंच्या शिष्यवृत्तीत वाढ व आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी शिष्यवृत्ती लागू करण्याबाबत. राष्ट्रीय स्तरावरील शालेय, ग्रामीण (पायका) व महिला क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना अधिक प्रोत्साहन मिळून त्यांच्या कामगिरीमध्ये सुधारणा व्हावी या दृष्टीकोनातून राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक व सहभागासाठी अनुक्रमे रु.11,250/-, रु.8,950/-, रु.6,750/- व रु.3,750/- प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक व सहभागासाठी अनुक्रमे रु.30,000/-, रु.22,500/-, रु.15,000/- व रु.11,250/- प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत थेट मंजुरी दिली जाते. संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी
2 टोकियो, जपान येथे सन २०२० मध्ये होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त पदक प्राप्त करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्यासाठी कार्यकारी समितीची स्थापना. महाराष्ट्र राज्याला क्रीडा संस्कृतीचा मोठा वारसा असून क्रीडा धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. तसेच क्रीडा विषयक पायाभूत सुविधा निर्माण व विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. खेळाडूंचा क्रीडा विषयक कामगिरीमुळे राज्याच्या व देशाच्या नावलौकीकात भर पडत आहे. तथापि प्रतिभावान खेळाडू घडविण्यासाठी खेळांच्या पायाभूत सुविधा, क्रीडा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन, सराव व प्रशिक्षणासाठी पुरेसे साहित्य, प्रशिक्षणाचा कृती आराखडा, खेळातील कौशल्यांवर प्रभुत्व येण्यासाठी सराव नियमित प्रशिक्षण, स्पर्धा, खेळाडूंच्या सकारात्मक मानसिकतेसाठी मानसोपचार ततज्ज्ञांचे मार्गदर्शन, आहारतज्ज्ञ, मसाजिस्ट, दुखापतीवर इलाजासाठी फिजिओथेरापिस्ट इत्यादी बाबींचे मार्गदर्शन खेळाडूंना पुरविणे आवश्यक आहे. वरील सर्व बाबींचा समन्वय राखून खाली नमूद खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणा-या राज्यातील ५५ खेळाडूंची निवड मिशन-२०२० ऑलिम्पिंक योजनेकरिता करण्यात आलेली आहे. सदर योजनेत ठराविक कालावधीनंतर या खेळाडूंच्या कामगिरीचे मुल्यमापन करुन निधी उपलब्ध करुन दिला जातो व अधिकृत आंतरराष्ट्रीय स्तरावरची कामगिरी व सन-२०२० च्या ऑलिम्पिक करिता राहिलेला शिल्लक कालावधी पाहून निवड केलेल्या खेळाडूंना पुढे कायम ठेवण्यात येणार आहे. मिशन ऑलिम्पिंक 2020 साठी निश्चित करण्यात आलेले खेळ प्रकार - ॲथलेटिक्स, कुस्ती, हॉकी, शूटिंग, वेटलिफिटंग, बॅडमिंटन, जलतरण, जिम्नॅस्टिक, टेनिस, टेबल टेनिस, मॉर्डन पेन्टॅथलॉन, सायकलींग, बॉक्सिंग, आर्चरी. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे.
3 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2001 - राज्य क्रीडा विकास निधी स्थापन करणे. क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन राज्यामध्ये परिणामकारकरित्या करण्याच्या दृष्टीने राज्यात क्रीडा सुविधा विकसित करणे, राज्यातील दर्जेदार खेळाडूंना परदेशी क्रीडा मार्गदर्शकांची सेवा उपलब्ध करुन देणे व राज्यातील नावाजलेल्या खेळाडूंना अर्थसहाय्य करणे, काही गुणवान खेळाडू दत्तक घेऊन त्यांच्याद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते खेळाडू घडविणे. तसेच राज्यात क्रीडा विषयक उपक्रम परिणामकारकरित्या राबविणे हा या योजनेचा उद्देश आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
4 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,1996 - कुस्ती कलेचा विकास कुस्तीगिरांना मानधन राज्यातील कुस्ती कलेची परंपरा जोपासण्यासाठी तसेच कुस्तीगीरांना त्यांच्या गुणांचा विकास होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मानधन देणे हा या योजनेचा उद्देश असून, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमार्फत दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या अधिवेशनात माती व गादी विभागात प्राविण्य प्राप्त व सहभागी कुस्तीगीरांसाठी मानधन देण्यात येते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे.
5 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,1996 - महाराष्ट्रातील राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या वयोवृध्द महिला/पुरूष खेळाडूंना मासिक मानधन देणेबाबत. महाराष्ट्र राज्यातील ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये अतुलनीय कामगिरी केली आहे अशा खेळाडूंना वृध्दापकाळात सन्मानाने जीवन जगता यावे या करिता दरमहा मानधन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
6 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012 - राज्यातील आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख बक्षिस देवून गौरविण्याची योजना. आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगिरी करुन राज्याचे नाव उज्वल केलेल्या राज्यातील पदक प्राप्त खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करणे व त्यांना प्रोत्साहित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
7 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012 - अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण व इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहित करणे, तसेच आर्थिकदृष्टया सक्षम नसलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्तेजन देऊन आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.
8 राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्त्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत. या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे नाव राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत गट-अ,ब,क व ड मधील पदावर थेट नियुक्ती देण्यात येते. शासन निर्णयात नमूद केलेल्या कार्यपध्दतीनुसार मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीच्या अहवालाच्या आधारे मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीमार्फत खेळाडूंच्या निवडीची अंतिम शिफारस करण्यात येते. त्यानंतर खेळाडूंना नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे.
9 राज्याचे क्रीडा धोरण 2012 क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य. राज्यातील शैक्षणिक संस्था, क्रीडा मंडळे, खाजगी क्लब, प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था यामधून दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट असून, पात्र संस्थांना अपेक्षित अंदाजित खर्चाच्या ७५टक्के अनुदान देण्यात येते. संस्थेने किमान २५ टक्के खर्च करणे आवश्यक आहे. क्रीडा सुविधा निर्माण करणे तसेच क्रीडा साहित्य खरेदीसाठी या योजनेमधून अनुदान देण्यात येते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे; संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी.